Amitabh bachchan congrats Prashant Damle 12500 Record Show

Amitabh bachchan congrats Prashant Damle 12500 Record Show

अभिनेते प्रशांत दामले हे गेल्या अनेक वर्षापासून मराठी नाट्य सृष्टीत ते अभिनय करत आहेत.

त्यांनी अनेक अश्या लोकप्रिय नाटकामधून भूमिका साकारली आहेत.

नाट्य बरोबर त्यांनी अनेक सिनेमे सुद्धा केले आहेत.

नुकतच त्यांनी सोशल मीडियातून एक फोटो शेअर करत "मी पोहचलो आहे... तुम्ही येतात ना...? ४ वाजेपर्यंत स्थापन व्हा!" अशी पोस्ट शेअर केली होती.

६ नोव्हेंबर २०२२ आज त्यांच्या नाट्य करिअर मधील १२५०० व्हा प्रयोग सादर केला.


तर बॉलिवूड चे महानक अमिताभ बच्चन यांनी सुद्धा प्रशांत दामले यांच्या १२५०० प्रयोगाला शुभेच्छा देत ट्विट केले की प्रशांत दामले यांचा 12,500 प्रयोगांचा विक्रम आज होतो आहे. 39 वर्षांत एवढे प्रयोग करणं ही कौतुकाची गोष्ट आहे! मी 'एका लग्नाची गोष्ट' या 1000 व्या प्रयोगाला गेलो होतो . आज मी उपस्थित नसलो तरी मनाने मी तिथेच तुमच्याबरोबरच आहे! माझ्याकडून प्रशांतजींना हार्दिक शुभेच्छा!



तसेच शुभेच्छा देताना त्यांनी १००० व्या नाट्य प्रयोगाला आपण उपस्थित असल्याचं उल्लेख सुद्धा त्यांनी फोटो शेअर करत केला. तसेच आज मी जरी तेथे नसलो तरी मनाने तुमच्या बरोबरच आहे असे ट्विट करत त्यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या.


प्रशांत दामले यांनी सुद्धा त्यांचे आभार मानत पोस्ट शेअर केली की 



धन्यवाद साहेब, अमिताभ बच्चन, अभिनेत्यांच्या पिढ्यानपिढ्या प्रेरणा देणार्‍या माणसाकडून असे कौतुकाचे शब्द येणे खरोखरच नम्र आहे. मनःपूर्वक कृतज्ञता!



या नाट्य प्रयोगाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे तसेच तारक मेहता फेम जेठालाल अभिनेते दिलीप जोशी सुद्धा उपस्थित होते, अभिनेते दिलीप जोशी तर खास या नाट्य प्रयोगासाठी अमेरिकेतून भारतात आले होते त्यांचे सध्या अमेरिकेत शूटिंग सुरू असल्याचं कळते.

या ऐतिहासिक अश्या नाट्य प्रयोगासाठी अनेक कलाकार हे उपस्थित होते.

मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे यांनी जोरदार पद्धतीने नेहमी प्रमाणे भाषण केले त्यांनी प्रशांत दामले यांचा सत्कार सुद्धा केला.







No comments

Powered by Blogger.