'लोकमान्य' (LOKMANYA)
'लोकमान्य' (LOKMANYA)
सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असा विचारात पुन्हा येतायत 'लोकमान्य' बाळ गंगाधर टिळक
स्वातंत्र्य लढ्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या सिंहाची गर्जना...
स्वराज्याचा अर्थ समजविणाऱ्या आणि स्वातंत्र्याचा सूर्य दाखविणाऱ्या महापुरुषाची महागाथा - लोकमान्य!
दशमी क्रिएशन्स निर्मित ही मालिका असून, मालिकेचे लेखन हे आशुतोष परांडकर यांनी केले आहे.
नवी मालिका ‘लोकमान्य’
21 डिसेंबरपासून बुध - शनि. रात्री 9:30 वा.
सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? असे रोकठोक सवाल इंग्रजांना विचारात इंग्रजांना जाब विचारला ते म्हणजेच लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित "लोकमान्य" ही २१ डिसेंबर २०२२ पासून सुरू होणारी झी मराठी वाहिनीवरील मालिका आहे.
स्वराज रक्षक छत्रपती संभाजी राजे यांच्या जीवनावर आधारित भव्य दिव्य मालिकेनंतर "लोकमान्य" ही मालिका प्रेक्षकांना आवडेल हे नक्की.
लोकमान्य टिळकांचा विचारांचा प्रभाव प्रेकषकांपर्यंत पोहविण्यासाठी झी वाहिनीवर ही मालिका सुरू होत आहे.
अभिनेते क्षितीज दाते हे लोकमान्य टिळकांची भुमिका साकारत आहेत, तर अभिनेत्री स्पृहा जोशी त्यांच्या पत्नीच्या भमिकेत दिसेल.
टिळकांनी इंग्रज सरकारचा केलेला सामना, त्यांचा राजकीय प्रवास तसेच कौटुंबिक आयुष्यात त्यांचा प्रवास, बालपण, महाविद्यालयीन जीवन, टिळकांचा विवाह अनेक अश्या त्यांचा जीवनप्रवास आपल्याला बघण्यास मिळणारं आहे.
मुंबईत अनेक ठिकाणी "सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" असा पोस्टर्स लागले होते.
राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थिती पाहता या पोस्टर्सनं लक्ष वेधून घेणारं हे तर नक्कीच.
त्यामुळे या पोस्टर्सची जोरदार चर्चा सुरू होती.
आता ते नेमके कुणी लावले? आणि का लावले हे काय कळतं नव्हते परंतू त्याचा नेमका अर्थ काय अशा चर्चा सुरू असताना आता यामागचं गुपीत अखेर उघड होत "लोकमान्य" ही मालिका प्रेक्षकांना बघायला मिळणार असल्याचे आपल्याला कळते.
Post a Comment